मुंबई : सातत्याने समाजासाठी झटणारी संस्था या ब्रिद वाक्याला अनुसरून नेहमी तळागळ्यातल्या समाजा पर्यंत पोचुन त्यांना मदतीचा हात देण्याचा पंचरत्न मित्र मंडळ(रजि.) प्रयत्न करीत असते. त्यालाच अनुसरून मु.पो. जेतवन नगर, आंबिवली (पू), कल्याण येथे आदिवासी परिवाराना (६० कुटुंबे) मोफत अन्नधान्य वितरण (६०० ते ६५० ) किलो व महिलांना भाऊबीज भेट म्हणुन साडी वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.अश्विन कांबळे ( वरिष्ठ प्रबंधक आरसीएफ), श्री.संतोष शिकतोडे( उप अभियंता न मुं म पा )तसेच विशेष पाहुणे श्री.राजेंद्र घरत( उपसंपादक - दैनिक आपले शहर) होते.पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री.प्रदीप गावंड तसेच मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वैभव घरत यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन श्री. रमेश पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळाचे सर्व सभासद, देणगीदार, हितचिंतक या सर्वांचे मंडळातर्फे मनापासुन आभार व्यक्त करत यापुढेही आपले सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.