एका नागरिकाला आठ ते दहा पोलिसांनी काठीमार, लाथाबुक्क्यानी मारहाण करत असलेला व्हिडिओ 27 मे 2019 रोजी सोशल मीडिया फेसबुक वर व्हायरल झाला होता.तो व्हिडिओ पाहून बारामतीच्या वकिलाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे त्यावेळी तक्रार केली होती.
तक्रारीची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले . त्यानुसार 23 सप्टेंबर 2022 रोजी गृह विभागाचे सचिव यांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये भरपाई द्यावी व संबंधित पोलीस अधिकारी, हवलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून संबंधित रक्कम या पोलिसांकडून वसूल करावी,असा आदेश देण्यात आला.

मारहाणीचा व्हिडिओ पाहताच बारामतीचे वकील तुषार झेंडे पाटील यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांना ट्विट केला. त्यानंतर लगेच समजले ती घटना जालना जिल्ह्यातील आहे.तात्काळ पोलीस अधीक्षक जालना यांच्याशी संपर्क करून माहिती विचारले असता, एका नागरिका मारहाणी बाबतची घटना पोलीस अधीक्षकांनी मान्य केले आहे. तात्काळ झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली यांच्याकडे पोलीस अधीक्षक जालना यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मानवी आयोगाने 18 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली व तात्काळ खुलासा सादर करून संबंधित कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच यादरम्यान पिढीतला आर्थिक मदत करू संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले गृह विभाग पोलीस अधीक्षक जालना यांच्या अहवालानंतर समजले मारहाण झालेली व्यक्तीचे नाव शिवाजी नारियालवाले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चंदगुडे बारामती पुणे