पुणे : डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील आर एम धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
डॉ कलाम यांच्या उत्तूंग व्यक्तिमत्वाचा आढावा घेताना ग्रंथपाल निलेश गिराम यावेळी म्हणाले, डॉ.कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण,त्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेली देशसेवा ,त्यांनी त्यांच्या जीवनात मिळविलेले पुरस्कार,त्यांनी लिहिलेली पुस्तके या सर्व कारणांमुळे त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असल्याचे ग्रंथपाल निलेश गिराम यांनी यावेळी सांगितले.इन्स्टिट्यूट डायरेक्टर डॉ.अनिता माने, अकॅडेमिक को -ऑर्डिनेटर डॉ.योगेश भोवते, डॉ.चारूलता कुलकर्णी, प्रा.अर्चना गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
