भरधाव कंटेनरने ठोकरल्याने झालेल्या अपघातात पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला.
कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया वय – ७८ रा. गोंगलेगल्ली ,कोर्टाजवळ अहमदनगर असे अपघातात
मृत्यू मुखी पडलेल्या पादचारी वृद्धाचे नाव असून पुणे – नगर महामार्गावरील सरदवाडी येथे अपघाताची ही घटना घडली.
कमलेश कन्हैयालाल फिरोदिया वय – ५० रा.अहमदनगर यांनी या अपघाताची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
तपास अधिकारी, पोलीस हवालदार
प्रफुल्ल शंकर भगत यांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनूसार, कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया वय – ७८ हे सरदवाडी येथे रस्ता ओलांडत असताना पुणे – नगर महामार्गावरून भरधाव चाललेल्या एम एच १२ एच डी ४२७८ या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकने फिरोदिया या वृद्धाला ठोकरले.

गंभीर जखमी झाल्याने कन्हैयालाल फिरोदिया यांचा या अपघातात मृत्यू झाला.
अज्ञात कंटेनर ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अपघाताचे तपास अधिकारी, पोलीस हवालदार प्रफुल्ल शंकर भगत यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रफुल्ल शंकर भगत या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे