शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी नानगाव ता.दौंड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीचे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३३ वर्षांनी एकत्रित आले.
सोशल मिडियाच्या माध्यमातून १९८९ च्या विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटित करून चर्चा घडवून आणून हा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते अशी माहिती १९८९ च्या बॅचचे १०वी तील विद्यार्थी, शालेय शिक्षक लालासाहेब जाधव यांनी दिली.


खुटबाव ता.दौंड येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात अंकुश कोंडीबा चौधरी, मुक्ताजी भिमाजी बिडगर, रामभाऊ लक्ष्मण वेताळ, सुरेश किसन जाधव या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
एकत्रित आल्याने भारावून गेलेल्या वातावरणात १९८९ मधील दहावीतील विद्यार्थ्यांनी लंगडी,रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा आनंद घेवून बल्ले,बल्ले…. या गाण्यावर ठेका धरत डान्स केला.
भविष्यात सर्वांनी असाच स्नेहपूर्ण जिव्हाळा जपत एकमेकांना मदतीचा हात देवून प्रगती साधावी असे आवाहन शिक्षक अंकुश चौधरी यांनी यावेळी केले. आजच्या आनंदामुळे आमचे आयुष्य एक वर्षांनी वाढले ,दरवर्षी एकत्र येवू अशी प्रतिक्रिया सविता रणदिवे, राणी झंवर यांनी यावेळी व्यक्त केली.
किशोर शेलार, रविंद्र इंदलकर, शोभा खळदकर, संगीता लव्हे, संगिता शिंदे, रामदास शितोळे, आशा दरेकर,राजेंद्र पाटोळे, मुबारक पठाण, भाऊसाहेब दरेकर, पांडूरंग खळदकर, सुदाम खळदकर, नामदेव फडके, राजू पठाण, मनोहर मगर, रेखा भागवत, संजय गवळी, सोपान शेंडगे, आप्पा काळे, सतिश कोंडे, दीपक खळदकर, बाळकृष्ण गुंड, दत्तात्रय गुंड, सुनील गुंड, दीपक शिंदे, बाळासाहेब अवसरे, सत्यवान हिवरे, महादेव बारवकर, राजू साळूंके, विठ्ठल भोसले हे १९८९ मधील दहावीच्या बॅचचे विद्यार्थी स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते.
बाळासाहेब आडागळे, महादेव शिंदे, फुलचंद कांबळे ,लालासाहेब जाधव या १९८९ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *