section and everything up until
* * @package Newsup */?> पालघर : जव्हार मध्ये,विजेचा खोळंबा,महावितरणचा रात्रीच लपंडाव चाले | Ntv News Marathi

व्यापर्‍यांचे हाल,गणेश मुर्तिकारांच्या कामांत विघ्न.

विजेअभावी पाणीपुरवठ्यास विलंब गृहिणींची तारांबळ.

   पालघर :जिल्ह्यातील जव्हार अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो.येथील भागात अन्न ,वस्ञ,निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.माञ या व्यतिरिक्त हि विजे अभावी ह्या भागातील नागरिकांना अंधारात संसार काढण्याची वेळ आलेली आहे.जव्हार शहरात काल मध्यरात्री पासुनच सलग दोन दिवस महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरु असल्याने शहरात बत्तीगुल होती.त्यामुळे सामान्य चाकरमान्यांचे मोठे  हाल झाले होते.
शहरात मंगळवारी मध्यरात्री पासुन बत्तीगुल असल्याने जव्हारवासियांना अहोराञ अंधारात काढावी लागली तर दुसऱ्या दिवशी विज वेळेवर आली नसल्याने शहरातील व्यापारी वर्गाचे मोठे हाल झाले होते.महावितरणची विज नसल्याने पहाटेचा पाणीपुरवठा हि जव्हार नगरपरिषदेकडून सोडण्यास विलंब झाला होता.लाईट नसल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्यात आल्याने काही भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.परंतु काही  ठिकाणी पाणी उशिरा आल्याने पाणी भरताना गृहिणींची तारांबळ उडाली होती.विज नसल्याने मोबाईल स्विच आँफ झाले होते,ईन्वेटर उतरले होते,मोबाईल सेवा ठप्प झाली होती. शहरातील बँका, झेराँक्स,प्रिटींग प्रेस,इलेक्ट्रॉनिक दुकाने,गणेश मूर्ती कारखाने सुरु असतानाही   विजेअभावी शुकशुकाट पाहावयास मिळत होता.त्यामुळे काही काळ  व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक व्यवहार कोलमडले होते.
    अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना महावितरणची बत्तीगुल असल्याने मुर्तिकारांच्या हाताला काम असताना हि लाईट नसल्याने आराम मिळाला होता.परंतु दिवस कमी उरल्याने गणेश मुर्तिकारांच्या हाताला वेग आला आहे.परंतु महावितरणच्या ह्या लपंडावाने गणेश मुर्तिकारांचे मोठे हाल झाले आहेत. 

“गणेश मुर्तींवर रंगरंगोटीचा शेवट हात फिरवताना कारागिरांच्या कामात सततच्या लाईट जाण्याने कामात विघ्न येत आहे.त्यामुळे कारागिरांच्या हाताला काम वाढले आहे”. = साईनाथ नवले गणेश मुर्तिकार,दुर्वा कला केंद्र जव्हार (गांधी चौक).

जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी (पालघर)
मोबा.नं*8408805860/मो.9404346064.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *