महात्मा फुले विद्यालय मागील घटना
वाशिम: मित्रासोबत विहिरीवर पोहायला गेलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रिसोड शहरातील महात्मा फुले विद्यालय पाठीमागील राजू खाडे यांचे शेतातील विहिरीत घडली.या घटनेनंतर रिसोड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.राम संतोष इंगळे वय १५ वर्षे असे मृतकाचे नाव असून तो येथील राजस्थान माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीला शिकत होता
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संत सातारकर महाराज परिसरातील राहणारा राम हा आज सकाळी आपल्या मित्रासोबत पोहायला गेला असता राम हा नवीनच पोहनं शिकत होता. यादरम्यान पाण्यामध्ये जाऊन तो एका कपारी मध्ये अडकला असल्याची माहिती मिळाली.राम खूप वेळ झाला तरी तो पाण्याच्या बाहेर आला नसल्याने त्याच्या सोबत असलेल्या मित्राने याबाबतची माहिती रामच्या नातेवाईकांना दिली. घटनास्थळी बघता बघता लोकांची गर्दी झाली. गळ टाकून राम यास बाहेर काढण्यात आले.विहरिची पाण्याची पातळी ही वर असल्याने राम यास पाण्याचा अंदाज आला नसल्याचे बोलले जात आहे. राम हा आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याचा एका भावाचे तीन वर्षांपूर्वी डेंगू या आजाराने मृत्यू झाला होता. रामच्या आई-वडिलांना कोणत्याही प्रकारचा सहारा राहिला नसल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले.