पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत ,आमदार ऍड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले .
ऋषिराज अशोक पवार यांची संस्था गट प्रतिनिधी गटातून यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. उर्वरित २० जागांसाठी दि.६/११/२०२२ रोजी मतदान होवून दि.७/११/२०२२ रोजी न्हावरे फाटा येथे मतमोजणी झाली. २० पैकी १९ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत आमदार ,ऍड अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने विरोधी दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे प्रेरणास्थान असलेले घोडगंगा किसान क्रांती पॅनेलवर मात करत घवघवीत यश संपादन केले.जनता दल सेक्यूलर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देवूनही घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला कारखान्याच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.न्हावरे सर्वसाधारण गट :- एकूण मतदान -१९३७५, वैध मते -१३५९७, झालेले मतदान – १३८२६
संजय ज्ञानदेव काळे ७८२६ मते मिळवून विजयी ,मानसिंग सिताराम कोरेकर ७६३९ मते मिळवून विजयी, शरद मोहनराव निंबाळकर ७७३२ मते मिळवून विजयी
तळेगाव ढमढेरे सर्वसाधारण गट :-

एकूण मतदान – १९३७५, वैध मते – १३६०४, झालेले मतदान- १३८२६
सोपान वाल्मिकराव गवारी ७६८६ मते मिळवून विजयी, विश्वास रामकृष्ण ढमढेरे ७३६२ मते मिळवून विजयी, पोपट रामदास भुजबळ ७१३६ मते मिळवून विजयी
शिरूर सर्वसाधारण गट :-
एकूण मतदान १९३७५, वैध मते १३६०९ ,झालेले मतदान १३८२६
वाल्मिक धोंडीबा कुरंदळे ७६१९ मते मिळवून विजयी, सुहास नारायण थोरात ७४१७ मते मिळवून विजयी,
प्रभाकर नारायण पाचूंदकर ७३७८ मते मिळवून विजयी
वडगाव रासाई सर्वसाधारण गटातून अशोक रावसाहेब पवार यांनी ८१७२ मते मिळवून विजय संपादन केला. उमेश सुदाम साठे यांनी ७४०९ मते मिळवून या गटातून विजय संपादन केला.
मांडवगण फराटा सर्वसाधारण गटातून घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादासाहेब गणपतराव फराटे यांनी ६९३८ मते मिळवून विजय संपादन केला. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे संभाजी शिवाजी फराटे यांनी ७१८० मते मिळवून विजय संपादन केला.इनामगाव सर्वसाधारण गटातून सचिन बाबासाहेब मचाले यांनी ७७६८ मते मिळवून, नरेंद्र अण्णासाहेब माने यांनी ७४५२ मते मिळवून विजय संपादन केला.शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने कारखान्याच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलला पाठिंबा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *