पुणे : मौजे लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे येथील अल्पभूधारक,होतकरु व प्रयोगशील शेतकरी श्री. उत्तम लक्ष्मण दुंडे यांचे ६३ वर्षे वय असून शिक्षण इ.१२वी पर्यंत झालेले आहे. कृषि विभागाच्या संपर्कात येण्यापूर्वी ते पारंपारिक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेत होते.त्यामुळे त्यांना शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे कमी प्रमाणात व मर्यादित स्वरूपात मिळत होते परंतु महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतकरी प्रशिक्षण वर्ग, शेतकरी चर्चासत्र, शेतीशाळा,शेतीदिन, शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम, शेतकरी सहल,कृषि प्रदर्शन,कृषि संजीवनी सप्ताह, खरीप , रब्बी,उन्हाळी हंगाम बिजप्रक्रिया मोहीम,खरीप, रब्बी उत्पादन वाढ तंत्रज्ञान प्रशिक्षण,धान्य महोत्सव, विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री,महाडीबीटी पोर्टल योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना , सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती प्रशिक्षण वर्ग , वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चर निर्मिती,क्राॅप सॅप योजना अंतर्गत पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प ,मग्रारोहयो अंतर्गत बांधावर फळबाग लागवड, गांडूळ खत प्रकल्प,नाडेप खत प्रकल्प तसेच आत्मा योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षिके या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन फळे, भाजीपाला,तृण धान्य, कडधान्य पिकांचे उत्पादन वाढ तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केल्याचे कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळूंजकर यांनी सांगितले.

कृषि सहाय्यक श्रीमती मुक्ता गर्जे, कृषि पर्यवेक्षक श्री.मेघराज वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी वेळोवेळी केल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली आहे. रब्बी हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये श्री.मेघराज वाळुंजकर कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी खपली गव्हाची लागवड करण्याचे आवाहन करताना त्यांना खपली गव्हाचे महत्त्व पटवून दिले.दैनंदिन मानवी आहारात या गव्हाचा वापर चपाती,लापशी,खीर,शेव ई ,रवा व पुरणपोळी मध्ये होत असल्याने खपली गव्हास मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गव्हातील ग्लुटिन फ्री प्रोटीन मुळे रक्तातील साखरेची पातळी , रक्तदाब व वजन नियंत्रित केले जाते. खपली गव्हात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने गहु पचनास हलका असुन त्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. या सर्व बाबींचे महत्त्व लक्षात घेऊन व बाजारपेठेतील ग्राहकांची वाढती मागणी पाहता सुधारीत पद्धतीचे खपली गव्हाची लागवड करण्याचे ठरविले. जुन्या झालेल्या पेरु बागेचे पुर्नजिवन करण्यासाठी पेरुची झाडे जमीनीपासुन दोन फुट अंतरावर कापून टाकली.सदर क्षेत्रात पेरू बागेत आंतरपीक म्हणून खपली गव्हाची लागवड करण्याचे नियोजन केले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत आत्मा योजनेअंतर्गत ०.४०हे क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले.बियाणे बिजप्रक्रिया साठी अॅझेटोबॅक्टर,पीएसबी,केएमबी या जैविक जिवाणूंचे काॅन्सरशिया कल्चर व ट्रायको डर्मा बुरशीचा वापर करुन बिजप्रक्रिया केली व टोकण पद्धतीने लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३०से.मी.व दोन रोपांतील अंतर १५से.मी. ठेवून दोन खपली बिया एका ठिकाणी टोकण करण्यात आल्या त्यामुळे एकरी फक्त १०किलो खपली बियाणे पुरेसे झाले.जिवाणु संवर्धक खतांची बिजप्रक्रिया, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चर चा अवलंब केल्यामुळे २५% रासायनिक खतांची बचत होऊन पिक उत्पादनात १५% वाढ दिसुन आली. तसेच पाणी व्यवस्थापन करत असताना पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देण्याचे नियोजन करून लागवडीनंतर १८,४२,३६ व ७२ व्या दिवशी फक्त ४ वेळा पाणी देण्यात आले.टोकण पद्धतीने लागवड केल्यामुळे गहू पिकास भरपूर सुर्यप्रकाश,मोकळी हवा मिळाल्यामुळे फुटवे फुटण्याचे प्रमाण जास्त आढळून आले.एका चुडात कमीत कमी ५०ते ७५ फुटवे व जास्तीत जास्त १५० ते १७२ फुटवे दिसून आले.पिकावरील मावा, ,तांबेरा,करपा या किड रोग नियंत्रण साठी जैविक पद्धतीने उपाययोजना केल्या यामध्ये निमतेल, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चर तसेच व्हर्टिसिलीयम,बिव्हेरिया व मेटारायझम या बुरशींचे काॅनसरशिया कल्चर,ट्रायको डर्मा व्हिरीडी,ट्रायकोडर्मा हर्जिनियम,सुडोमोनस, बॅसिलस सबस्टीलस यांचा अवलंब केला. किड रोग नियंत्रण साठी रासायनिक किटकनाशके व बुरशीनाशके यांचा वापर टाळण्यात आला व उर्वरित अंश विरहीत विषमुक्त गव्हु उत्पादनावर भर देण्यात आल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळूंजकर यांनी दिली.
कृषि विभागाच्या …