पुणे :-
पळसदेव तालुका इंदापूर येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव गुलाबराव काळे( वय -७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा प्रा.रामकुमार काळे व चार विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलात ठाणे, भिवंडी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ग्रामीण व गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी अत्यंत प्रभावी सेवा बजावली.
कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पोलीस खात्यात ३९ वर्षे त्यांनी सेवा केली.
इंदापूर येथील पत्रकार तानाजी गुलाबराव काळे यांचे ते बंधू होत.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628