पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील श्री.नवनाथ दिंडीचे कोंढापुरी ते श्री.क्षेत्र आळंदी पायी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार दि.१९/११/२०२२ रोजी सकाळी ८ वाजता कोंढापुरी येथील विठ्ठल मंदीरातून वारी सोहळ्यास सुरूवात होणार असून या दिंडीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती ग्रामस्थ सतिश फक्कडराव गायकवाड यांनी दिली.
आळंदी येथील श्री.गुरूदेव वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वंभर महाराज कदम ह.भ.प.विष्णू महाराज भांबळे यांचे सर्व सहकारी, कोंढापुरी भजनी मंडळ या गायकवृंदांची पायी वारी सोहळ्यास साथ लाभणार असून दिंडीत सहभागी झालेल्या वारक-यांना कोंढापुरी येथील ग्रामस्थ सतिश फक्कडराव गायकवाड व अशोक माधवराव गायकवाड सकाळची न्याहरी देणार आहेत.
१९/११/२०२२ रोजी शिक्रापूर – चाकण रस्त्यालगत असलेल्या मांढरेवस्ती येथे दुपारी १२ वाजता जेवण देणार आहेत.
बहूळ येथील खलाटेवस्तीवर संध्याकाळचा मूक्काम असणार असून प्रकाश खलाटे ,चंद्रकांत खलाटे संध्याकाळचे जेवण दिंडीतील वारक-यांना देणार आहेत. रात्री ७ ते ९ वाजता ह.भ.प.विलास महाराज वाघ यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. २०/११/२०२२ रोजी बहुळ येथून दिंडीचे प्रस्थान होणार असून शेलपिंपळगाव येथील कैलास मोहिते सकाळची न्याहरी दिंडीतील वारक-यांना देणार आहेत. सतिश गायकवाड,अशोक गायकवाड दिंडीतील वारक-यांना दुपारचे जेवण देणार असून आळंदी येथील ह.भ.प.चौधरी महाराज यांच्या धर्मशाळेत दिंडीतील वारकरी संध्याकाळी मुक्काम करणार आहेत. संजय मारूती गायकवाड हे दिंडीतील वारक-यांना संध्याकाळचे जेवण देणार आहेत अशी माहिती सतिश फक्कडराव गायकवाड यांनी दिली.
