औरंगाबाद : भारत निवडणूक आयोगाने विशेष पुनरिक्षन कार्यक्रम अंतर्गत तिसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.या ग्रामसभेचा अध्यक्षस्थानी उपसरपंच श्री.नागेश कुठारे हे होते. या ग्रामसभेत तिसगाव परिसरातील भाग 13,14,15,16,17,18 च्या मतदार याद्यांचे वाचन करण्यात आले. तसेच दिनांक 1 जानेवारी 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणार्या नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. याशिवाय मतदारांना यादी पाहण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध राहतील असे सांगितले. यावेळी BLO श्री.नितीन घोडके यांनी सर्व कार्यक्रमाची माहिती दिली. श्री. नागेश कुठारे यांच्या अध्यक्षीय मनोगताने समारोप करण्यात आला. सभा प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश बिलंगळ, प्रविण हांडे, काकासाहेब बुट्टे, ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, केंद्रस्तरीय अधिकारी नितीन घोडके, सविता बोईणे , सुजाता साळवे, संभाजी बनकर, हिरामण दणके, सुभाष लवाळे यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळूज औरंगाबाद.
मो.8484818400