औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदातांडा येथील सामाजिक कार्यकर्ते वरदानसिंग ठाकुरसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्ताने बुलढाणा येथे द लव ट्रस्ट अनाथ आश्रम बुलढाणा येथे अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तुंची किट वाटप करण्यात आली आणि वरदानसिंग चव्हाण यांनी या अनाथ मुलांना थंडी पासुन बचाव होण्यासाठी उबदार कपडे वाटप करण्यात आले वाढदिवसाच्या निमीत्ताने हा सामाजिक बांधलकीचा कार्यक्रम राबविण्यात आला
नांदातांडा या परीसरामधे वरदानसिंग चव्हाण यांचे नेहमी सामाजिक काम कार्य चांगले अग्रेसर आहे त्यांनी असे ठरविले वाढदिवसा वरती जास्त खर्च नकरता वाढदिवस अगदि साध्या पद्धतीने साजरा करुन हाच पैसा काही नविन कार्यक्रम राबवुन गोरगरीब आणि अनाथ मुलांना गरजु जीवनावश्यक वस्तुंची वाटप करुन साजरा करावा असे वरदानसिंग चव्हाण यांनी ठरविले आणि हा उपक्रम वाढदिवसा निमीत्ताने राबविला भेट वस्तु कार्यक्रमादरम्यान बुलढाणा द लव ट्रस्ट अनाथ आश्रम चे कर्मचारी पदाधीकारी आणि सोबत पंडीत चव्हाण , आत्माराम चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण ,मनोज चव्हाण हे यावेळेस उपस्थित होते अशी माहिती वरदानसिंग चव्हाण यांनी दिली
