औरगाबाद : गेल्या दहा दिवस दोन फ्रेंच जोडपी महाराष्ट्रात फिरत आहेत. अजिंठा वेरूळ सारख्या जगप्रसिद्ध स्थळां शिवाय बोकुड जळगांवची यात्रा, अंबडचा मत्स्योदरी मंदिरावरचा दीपोत्सव, शेंदुरवाद्याचा मध्वमुनीश्वर आश्रमातील संगीत दीपोत्सव याला त्यांनी आवर्जुन भेट दिली. हा आगळा वेगळा अनुभव घेतला. आज अजिंठा लेणी पाहुन रात्रीच्या मुक्कामासाठी डोंगरकुशीतले सुंदर देखणे उंडणगाव निवडले.

महाजनांचा हा १५० वर्षांपुर्वीचा वाडा मोठा भक्कम आणि देखणा आहे. निलेश महाजन या आमच्या मित्राने वाड्याची डागडुजी दुरूस्ती नजाकतीने केली आहे. अलीकडचा भाग मिलींद-प्रशांत महाजन या भावांचा आहे. त्यांनीही दुरूस्तीचे काम संपवत आणले आहे.

छोट्या गावात जावुन राहणे, तिथेच चुलीवर शिजवलेले अन्न खाणे, पळसाची पत्रावळ हाताने बनवुन त्यावर जेवणे, मंदिरातील भजन कीर्तन ऐकणे, सण समारंभ उत्सव परंपरा समजुन घेणे, याच परिसरांतील वस्त्र परिधान करणे असा शाश्वत पर्यटनाचा फार व्यापक पट आहे. यातुन स्थानिक रोजगार निर्मिती झाली पाहिजे हाही उद्देश आहे. गावात बलुतेदार काम करतात ते समजुन घेणे. त्यांचे उद्योग जे आज चालु आहेत त्यांना प्रोत्साहन देणे असे कितीतरी पैलू आहेत.
निळ्या टी शर्ट मधला आमचा फ्रेंच मित्र विसेंट पास्मो निष्ठेने महाराष्ट्र, मराठवाडा आणि त्यातही परत औरंगाबाद परिसरात हे काम गेली ८ वर्षे करतो आहे.

त्याने जुन महिन्यात आपल्या परिसरांतील बारवा मंदिरे वाडे सण समारंभ उत्सव यांच्या छायाचित्रांचे एक प्रदर्शनच पॅरिसला भरवले होते. त्या माध्यमातुन तेथील पर्यटक आता या भागात येवु लागले आहेत. हे काम किती कष्टदायक किचकट संयमाने करावे लागणारे आहे याची मला एक साक्षीदार म्हणुन चांगलीच माहिती आहे.
एकीकडे परदेशी क्रिश्चन मिशनरी बनुन धर्मांतर घडवुन आणणार्‍यांचा विषय आसामात गंभीर बनलाय. आणि दुसरीकडे विन्सेंटसारखा हिंदू सण समारंभ परंपरा परदेशी लोकांना जीव तोडून समजुन सांगतोय पटवुन देतोय. (व्हिन्सेंट ख्रिश्चन नाही) त्याची आई आणि बहिण यांनी दिवाळी भारतात येवुन साजरी केली.

एका गोष्टीची खंत वाटते. फ्रेंच सरकार त्याला भारतात जावुन पर्यटनासाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन देतं. आणि उलट आपण सरकारी लालफितीचा अडथळा बर्‍याचदा निर्माण करतो.

आपणही सगळे मिळून शाश्वत पर्यटनाचा हा प्रयोग अजुन व्यापकपणे चालवु या. आपली ताकद यापाठी लावु. याच गावात अनिरूद्ध नाईक हा आमचा मित्र कृषी पर्यटनासाठी झटत आहे. त्याने कृषी पर्यटन केंद्र गणेशवाडीत सुरू केले आहे.
माझे मित्र अँड मिलिंद महाजन,,निलेश महाजन,, प्रशांत महाजन यांच्या जूना वाढा येथे ओट्यावर प्रदेशातील पाहुणे सोबत ग्रामपंचायत सदस्य आजगर झारेकर प्रशांत महाजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *