औरगाबाद : होली फेथ इंग्लिश स्कुल भराडी येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २०२२-२३ आयोजित करण्यात आली होती. यात होली फेथ इंग्लिश स्कुल भराडी, कॅम्ब्रिज इंग्लिश स्कुल सिल्लोड, स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुल शिवना, इरा स्कुल सिल्लोड, स्वामी विवेकानंद विद्यालय सिल्लोड, सिद्धेश्वर हाय-स्कुल भवन, इत्यादी शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन भराडीचे प्रथम नागरिक सरपंच पप्पू अप्पा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी होली फेथ इंग्लिश स्कुल चे संस्थापक अध्यक्ष संतोष सोनवणे, तालुका क्रीडा समन्वयक कृष्णा धनवट, मार्गदर्शक नईम सर व माने सर, मुख्याध्यापक समाधान सोनवणे, तसेच पंच कमिटी म्हणून महेंद्र चौधरी ,दिगंबर भोसले, प्रकाश चिकटे, मयुरेश सामिंद्रे, ताराचंद जैस्वाल, अविनाश सुरडकर आदींची उपस्थिती होती.
विजयी विद्यार्थांची निवड जिल्हास्तरासाठी करण्यात आली व विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले तसेच शाळेला बेस्ट परफार्मर स्कुल या अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. या साठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.अविनाश सुरडकर सर बुद्धिबळाचे प्रशिक्षक श्री मयुरेश सामिंद्रे सर यांनी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष श्री संतोष सोनवणे व मुख्याध्यापक समाधान सोनवणे, होली फेथ इंग्लिश स्कुल चे शिक्षक योगेश सोनवणे, संतोष राकडे सर, मनोज पी पी, गोरडे श्रावण, जेम्स , अभिषेक शिंदे, शिवकुमार वाघ, भागवत ज्योती, जगनाडे जयश्री. गौर राजेश्री, अलका भोपळे, अश्विनी झाल्टे, बिलांगे वर्षा, टाकसाळे मनीषा, जया लक्ष्मि, मयुरी हिरप, तायडे प्रियांका, काकडे वनिता, काळे ज्योती, मोरे अश्विनी, विजया सोनवणे, मोहिनी गरुड, मरथा जॉर्ज, पाटील प्रियांका, लोंढे रोहिणी, अंजना जेकब, नम्रता सोनार, संजना साखला, गीता घड्मोडे, वैशाली काकडे, इतर कर्मचारी व शालेय वाहनाचे चालक मालक यांनी अभिनंदन केले.