(सचिन बिद्री:उमरगा)
दि७/११/२०२० रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांग संघटणा/समितीचे पदाधिकारी समवेत बैठक संपंन्न झाली. त्या अनुषंगाने दि१४/११/२०२२ रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती शाखा उस्मानाबाद समितीचे प्रदेश अध्यक्ष का.तु.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा शासकीय विश्राम गृहात आढावा बैठक घेण्यात आली, यामध्ये सर्वप्रथम दिव्यांगासाठी स्वतंञ मंञालय आणी जिल्ह्यत दिव्यांग भवनाची मा.मुख्यमंञी व मा.राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांचे अभार माणुन व टाळ्यांचा गजरात एकमेकां साखर भरवून सर्व दिव्यांग बंधू भगिनीनी आनंद व्यक्त केला व बैठकित विविध विषयावर चर्चा करण्यात आली.यामध्ये आवर्जून दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड ६०%दिव्यांगांना अद्याप न भेटले बाबत,दिव्यांगांच्या पगारी वेळेवर होत नसले बाबत,दिव्यांगानाअत्योंदय रेशनकार्ड मिळणे,दिव्यांगांना ५% शेष निधी अद्याप संबंधित ग्रामसेवक यांनी खात्यावर जमा न केले बाबत,दिव्यांगांचा शासकीय/निम शासकीय नौकरीत अनुशेष भरण्यात न आले बाबत,एस टी प्रवासात दिव्यांगाच्या अरक्षण मिळन्यासाठी महामंडळास पञ देणे,उप संचालक अरोग्य विभागात लातुर येथे दिव्यांगांनी दाखल केलेले अपील योग्य तपासणी होत नसले बाबत,बऱ्याच दिव्यांगाचे अधार कार्ड अभावी दिव्यांग प्रमाणपञ मिळत नसले बाबत,दिव्यांगांना ग्राम पंचायत मार्फत घरपट्टी/नळपट्टी माफ करन्यासाठी ग्राम सभेत ठराव घेणे बाबत,दिव्यांग बांधव/भगिणी यांच्या पगारीत रूपये ५०००होणे आणि शासनाकडे मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन पाठविणे बाबत व तसेच मतीमंद दिव्यांगांना वार्षिक रू २५०००रुपये सरसकट मिळणेबाबत अश्या विविध ज्वलंत विषयावर यावेळी बैठकीत चर्चा संपन्न झाली.
या बैठकीत समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष का.तु.शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्ष शेख ईसाक,जिल्हा उपाध्यक्षा निर्मला सुरवसे, उमरगा शहराध्यक्ष नामदेव कदम,जिल्हाउपाध्यक्ष पंडीत जळकोटे,रामेश्वर मदने,बिरु गावडे, निळकंठ कांबळे, महेश सुरवसे,सदस्य,सिध्देश्वर गायकवाड,विशाल पुजारी,नारायन भूसनरे,बाबु लंगडे,नरसिंग सुरवसे,सुर्यकांत सुतके,कंठक धांडे,तुकाराम वाडेकर,प्रदिप पाटील,मशाक शेख,तान्हाजी सोमवसे,आकाश गायकवाड,लक्ष्मी बिराजदार,भारताबाई बोडसे,सुनंदाबाई सुतके,कलावती गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग बंधु-भगिणी उपस्थित होते.