न्यायालयाने ठोठावला ८५०००/- रुपयांचा दंड
उस्मानाबाद : मा.आयुक्त श्री.कांतीलाल उमाप राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबई,श्री. सुनिल चव्हाण दक्षता व अंमलबजावणी संचालक,श्री.पी.एच.पवार विभागीय उपआयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार व श्री.गणेश अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राउशु, तुळजापूर, निरीक्षक
राउशु तलमोड व दुय्यम निरीक्षक, राउशु उमरगा व तुळजापूर या कार्यालयाने दि ११ रोजी उमरगा शहर व परीसरातील धाब्यांवर अवैधरित्या दारुचा सार्वजनिक गुत्ता चालवुन ग्राहकांना मद्य पिण्यास सोय उपलब्ध करुन दिल्याने उमरगा शहरातील हॉटेल आबाचा धाबा, हॉटेल भाग्योदय तसेच उमरगा ते आळंद रोडवरील हॉटेल मैत्री या ठिकाणी सदरच्या हॉटेलला शासनमान्य दारुविक्रीची अनुज्ञप्ती नसताना ग्राहकांना मद्य पिण्यास परवानगी दिल्याने सदरच्या ठिकाणी छापा घालुन धाबा मालक व मद्यपी यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ,ब) व ८४ अन्वये
गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. सदर कारवाईत धाबामालक- १) प्रकाश राजु डोंगरे २) सोमनाथ दत्तु सुरवसे ३) आशिश महिंद्र कांबळे तसेच मद्यपी ग्राहक ४) चंद्रकांत माणिक कोराळे ५) दिबंगर शिवाजी पाचंगे ६) युवराज तोतप्पा व्हनाजे ७) शिवानंद गुंडू बिलगुंदे अश्या एकुण ०७ आरोपींना अटक करुन मे.
न्यायालय, उमरगा येथे हजर केले असता धाबामालक यांना प्रत्येकी २५००० व मद्यपी यांना प्रत्येकी २५००/- असा एकुण रु.८५०००/- दंड आकारण्यात आलेला आहे.
सदरची कारवाईत निरीक्षक श्री.सचिन भवड, श्री. जे. बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक श्री.सी.डी.कुंठे, श्री. पी.बी. गोणारकर, श्री. एस. बी. सिद,श्री. एस. डी. चव्हाण, सहा. दुय्यम निरीक्षक श्री. झेड एस काळे जवान श्री. विनोद हजारे, श्री. आर.बी.चांदणे, श्री.ए.एनकोळी,श्री.एस. एस.वाघमोडे,श्री.के.एस.देशमुखे,श्री.एस.बी. कलमले श्री. दिलीप नारखेडें व श्री. राजेंद्रसिंह ठाकुर यांचा समावेश आहे.
सचिन बिद्री, उमरगा