निराधार, विमा, शेतकऱ्यांचे रेशन आदी मागण्यासह ;महामार्गाच्या कामासाठी टोलनाके बंद करण्याचा दिला इशारा

उस्मानाबाद : उमरगा लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात विविध मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी,उमरगा तालुका अध्यक्ष संजय पवार,लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे यांच्या प्रमुख आस्थितीत रस्ता रोको आंदोलन (दि .७ )उमरगा शहरातील अशोक चौकात करण्यात आले . यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही वेगवेगळे निवेदन देण्यात आले .कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरल्याने वाहतूक तब्बल दीड तास ठप्प होती .
हे खोके सरकार भाजप सरकारचे हस्तक असून महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग धंदे गुजरातला हलवून महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करण्याच षडयंत्र करीत आहे.मागील आठ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस सनदशील मार्गाने महामार्गाच्या कामासाठी सातत्याने आंदोलन करीत आहे . महामार्गाची मागणी पूर्ण न झाल्यास येत्या १२ डिसेंबर नंतर टोलनाके बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या भाषणात केले . शेतकरी बांधव अडचणीत असताना सत्ता हातात असूनही हे शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही . स्वतःची घर भरणाऱ्या या सरकारला शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे मत लोहारा तालुका अध्यक्ष श्री साळुंखे यांनी व्यक्त केले . उमरगा लोहारा तालुक्यातील विविध प्रश्न आधांतरी ठेवून गुवाहाटी ,सुरत, करत फिरण्यासाठी जनतेने लोकप्रतिनिधींला निवडून दिलेले नव्हते .जनता येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत या गद्दारीची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे मत उद्योग सेलचे प्रदेश सहसचिव जगदीश सुरवसे यांनी भाषणात व्यक्त केले . महागाईचा बकासुर देशाला गिळंकृत करत असून मोदी शिंदे सरकार डोळे बंद करून बसले आहेत देश उद्योग विकत असताना जनता प्रत्यक्ष पाहत आहे याचा जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रदेश युवक सचिव दिग्विजय शिंदे यांनी मत व्यक्त केले, बाबा जाफरी, प्रकाश सुभेदार, शमशोद्दीन जमादार, आदींची भाषणे झाली .


देण्यात आलेल्या निवेदनात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा,२०२० चा शिल्लक पिक विमा त्वरीत मिळावा उमरगा – लोहारा तालुक्यातुन जानाऱ्या महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करुण गुन्हे दाखल करावेत, यात क्वॉलीटी कंट्रोल (गुणवत्ता नियंत्रक) विभागातल्या अधिकाऱ्यांना जवाबदार धरुण निलंबीत करावे, अर्धवट स्थितीतील काम पुर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाके बंद करावेत व त्वरीत रस्त्याची दुरुस्ती करावी,तसेच अर्धवट स्थितीतील उड्डाण पुलचे कामे त्वरीत पुर्ण करावीत . महाराष्ट्रातील वेदांता, फॉक्सकॉन , टाटा एअर बस हे व यासारखे इतर उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रात पुनर्वस्थापित करावेत,उमरगा -लोहारा तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजणेच्या अर्जदारांचे प्रस्ताव त्वरीत मंजुरी देऊन निकाली काढावेत .शेतकऱ्यांचे बंद करण्यात आलेले रॅशन (शिधा) त्वरीत चालु करण्यात यावे . महाराष्ट्रातील रद्द करण्यात आलेली पोलीस भरती त्वरीत घेण्यात यावी, गगनाला भिडलेल्या महागाई कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने संयुक्त उपाययोजना कराव्यात . अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी भीमा स्वामी ,बापू बिराजदार ,बाळासाहेब स्वामी, गोविंदराव साळुंखे,अच्युत साठे, खाजा मुजावर, शंतनू (भैय्या )सगर , धीरज बेळंबकर, सुनिता पावशेरे, मोहन जाधव,भाग्यश्री रणदिवे,साधना सलगरे , संगीता सलगरे , सविता पवार,सुशील दळगडे, बालाजी साळुंखे ,नेताजी कवठे, कुमार थिटे ,मोहन शिंदे, अजित पाटील , ओम गायकवाड, माधव नांगरे, बाळासाहेब बुंदगे, प्रकाश भगत फरीद अत्तार, फैयाज पठाण, रणजीत बिराजदार, नंदू जगदाळे ,वाघंबर सरवदे , खंडू काळे, प्रभाकर माने, विठ्ठलसिंह राजपूत, अयुब इनामदार, बाळू माशाळ, किसन कांबळे, कल्लेश्वर जाधव, नंदू बिराजदार, बाळू परताळे, सतीश सुरवसे, आधी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *