अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असुन महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात सोबतच संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले
असुन त्यांना मरणोत्तर भारतरत्नर पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी भारतीय टायगर सेनेचे सरचिटणीस वसंत गायकवाड यांनी भारत जोडो पदयात्रेत निमीत्त आलेले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना निवेदन देत केली आहे त्याबरोबर कोरोना लाॅकडाऊनमुळे कष्टकरी गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या नागरीकांचा रोजगार हारवला गेला आहे त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी भरीव अर्थीक मदत देवून रोजगार उपलब्ध करावा अशी मागणी देखील निवेदनात नमूद केली आहे.