हिंगोली शहरातील आदर्श शिक्षण संस्थेचे आदर्श महाविद्यालयात दि 19 नोव्हेंबर शनिवारी रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.विलास आघाव यांच्या शुभहस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी केलेले कार्य तसेच त्यांच्या कार्यकाळात घेतलेले धाडसी निर्णय इत्यादी कार्याचा उल्लेख करून विचार मांडण्यात आले. इंदिरा गांधी जयंती राष्ट्रिय एकात्मता दिन म्हणून साजरे करण्यात आले. याप्रसंगी मेजर पंढरीनाथ घुगे यांच्याकडून उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ देण्यात आली. सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, पर्यवेक्षक प्रा. अनिल शास्त्री, अधीक्षक श्री दिलीप दुबे, स्टाफ सचिव प्रा. डॉ. अण्णाजी मडावी, सहसचिव प्रा. किशोर गुजराथी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. किशोर गुजराथी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जीवन मोरे, श्री धम्मा इंगोले यांनी परिश्रम घेतले.