
एमआयटी पॉलिटेक्निकल रोटेगाव येथे” डॉ एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शन” आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात तालुक्यातून विविध स्तरातून माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहभाग नोंदविला होता या प्रदर्शनात विज्ञानाच्या संदर्भात विविध उत्सुकता जिज्ञासा ,संशोधन वृत्ती अनेक मॉडेल ,प्रतिकृती यासारख्या बाबीची मुलांमध्ये दिसून आले या प्रदर्शनात न्यू हायस्कूल वैजापूरचे विद्यार्थी चि. वैभव मतसागर ,आदित्य मतसागर, संकेत शिंदे, धीरज पवार तसेच विज्ञान शिक्षक श्री संजय वाणी सर व श्री संतोष निकम सहभाग नोंदीला होता त्यांनी “हायड्रोलिक जेसीपी” या प्रतिकृती सादर केली उत्कृष्टपणे संवाद कौशल्य, मांडणी यासारख्या बळावर या प्रदर्शनात त्यांना सांघिक तिसरे पारितोषिक मिळाले, रोख रक्कम 2000 व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
या त्यांच्या यशाचे कौतुक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री भगवान नाना तांबे ,सर्व शालेय समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री व्हि.डि. सोनवणे पर्यवेशक साळुंखे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक वर्ग सर्व गटातून त्यांचं कौतुक व अभिनंदन होत आहे.
वैजापूर,औरगाबाद