वैजापूर येथे न्यू हायस्कूल वैजापूर या शाळेत 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आले यावेळी शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानासंदर्भात महत्त्वपूर्ण बाबीवर प्रकाश टाकण्यात आला मुलांनी आपले अनेक विचार मांडले शाळेचे श्री कीर्ती सर यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून विपुल माहिती विद्यार्थ्यांसमोर सांगितली त्यांच्या माहितीने विद्यार्थी मग्न झाले

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री भगवान नाना तांबे ,सर्व शालेय समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. डी.सोनवणे ,पर्यवेक्षक श्री साळुंखे सर ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,प्रचंड प्रमाणात विद्यार्थी पालक वर्ग यासारख्या उत्स्फूर्तपणे वातावरणात संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे पुत्रसंचलन श्री शेजुळ यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक साळुंखे सर यांनी मानले.
वैजापूर,औरगाबाद