वाशिम : दि.२१ रोजी सकाळी नाकाबंदी करीत असताना मालेगाव शहरातील शिवचौकामध्ये पोलिसांनी एक मिनिट्रक त्यामधील अवैध सुगंधित गुटख्यासह जप्त केला. त्या गुटख्याचीकिंमत 8 लाख 91 हजार रुपये आहे जप्त केलेला ट्रक व गुटख्याची किंमत 15 लाख 91 हजार रुपये आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम यांचे कडुन अवैद्य धंदयावर कार्यवाही करण्या करिता सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत आज दि. 21. रोजी शहरामध्ये शिवचौक येथे परिविक्षाधीन पोलीस उप निरीक्षक सारीका नारखडे व रात्रगस्त वरील कर्मचारी हे नाकाबंदी डयुटी करीत असतांना सकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास एक टॅम्पो क्र. MH 27 x 0577 क्रमांक दिसुन आला. हा टॅम्पो संशयास्पद असल्याची शंका आल्याने तो अधिकारी व कर्मचारी यांनी चेक केला असता त्यामध्ये गुटखा सदृश्य सुगंधीत पदार्थ आढळुन आल्याने माल व ट्रक पोलीस स्टेशनला आणुन सदर मालाचा रितसर पंचनामा केला असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी गुटखा एकुण किमंत अंदाजे 8,91,000/-रु चा माल मिळुन आला. वरुन सदर ट्रक वरील चालक व क्लिनर नामे 1) शेख अयफाज शेख जाफर वय 25 वर्ष व्यवसाय चालक रा. यास्मीन नगर काटा रोड अमरावती, 2) शेख दानीश शेख इस्माईल वय 19 वर्ष व्यवसाय क्लिनर रा. रहेमान नगर नागपुरी गेट च्या समोर अमरावती यांना अटक करुन जप्त गुटखा माल व वाहन असा एकुण 15,91,000/-रु. चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही ही जिल्हा पोलीस अधिक्षक अपर पोलीस अधिक्षक उपविभागीयपोलीस अधिकारी. यांचे मार्गदर्शना मध्ये मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने सह पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे, पोलीस उप निरीक्षक सारीका नारखेडे व पोलीस कर्मचारी पोहेकॉ. भगत, नापोकॉ. गायकवाड, नापोकॉ.पवार, पोकॉ.जाधव, पोकॉ. किल्लेकर, पोको ऊगले. मालेगाव पोलीसांनी हि कार्यवाह केली आहे.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम