जालना : जालना तालुक्यातील साळेगाव जालना येथील बुद्ध भूमी येथील बौद्ध विहारात दि.22/8/2021 रोजी सकाळी 10:30 वा. आषाढ पौर्णिमा निमित्ताने बौद्ध धम्माच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी येणाऱ्या उपासक व उपासिका, बाल बालिका यांना प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात येणार असून तीन प्रश्नांची उत्तरे देण्यार्यांना बुद्ध मुर्ती पूज्य भिक्कु रेवत यांच्या हस्ते दान देण्यात येणार आहे प्रथम तथागत गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दिप धुप पुष्पाने पूजा करून बुद्ध वंदना व उपासथ करणार्यांना 11 च्या पुर्वी भोजन व लगेच प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेऊन उत्तरे देणाऱ्यांना बुद्ध मुर्ती दान दिली जाईल नंतर भिक्कु रेवत यांचा धम्मदेशना होऊन शेवटी सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम होईल असे भिक्कु रेवत यांनी सांगितले आहे.तरी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सूचना भिक्कु रेवत यांनी केली आहे.
जालना घनसावंगी
प्रतिनिधी राजेश वाघमारे