पुणे जिल्हा क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने करंदी ( ता.शिरूर ) येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय २०२२-२३ आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील आर.एम.धारिवाल विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षे वयोगटातील मुलींनी तृतीय क्रमांक मिळविला.
आर.एम. धारिवाल विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजयकुमार गजऋषी यांनी ही माहिती दिली.
करंदी येथील विद्या विकास मंदीर व उच्च माध्यमिक विद्यालयाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविण्याबरोबरच एक उत्कृष्ट संघ म्हणूनही सन्मान मिळविल्याचे विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार गजऋषी यांनी सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य ,मुख्याध्यापक संजयकुमार गजऋषी, शिक्षक आनंदा धोंडे, बापू खारतोडे, पत्रकार विजय ढमढेरे,शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थांनी व्हॉलीबॉल स्पर्धेतील टीमचे अभिनंदन करून कौतुक केले.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628