पुणे : भरणेवाडी ता.इंदापूर येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना भरणे म्हणाले,गेल्या काही वर्षात तालुक्यातील असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवताना दिसत आहेत.त्या अनुषंगाने आपण ठिकठिकाणी अभ्यासिका बांधण्याचा प्रयत्न करत आहे.विद्यार्थ्यांनी तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेवून आपले ध्येय गाठण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदी निवड झालेल्या लासुर्णे येथील रोहन लोंढे,राज्य कर निरीक्षक पदी निवड झालेल्या डाळज नं.२ येथील धर्मराज पानसरे,अकोले येथील श्रीकांत दराडे, वकीलवस्ती येथील अजय भांडे,पिंपरी बु.येथील योगेश गायकवाड यांचा तर एनडीए मध्ये देशात ६९ वा क्रमांक पटकावलेल्या इंदापूर येथील मानव प्रशांत हेळकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिन सपकळ,नंदकुमार रनवरे,श्रीमंत ढोले,नितीन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे