जिल्ह्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा
सचिन बिद्री:उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत नळदुर्ग पोलिसांनी दि 1 नोव्हेंबर वार गुरुवार रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर सापळा रचून एक तांदळाचा ट्रक पकडला असून सदर ट्रक इटकळ पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे .रेशन चा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी ट्रक जात असल्याची खबर नळदुर्ग पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे प्राप्त झाली होती.त्यावरून सदर कारवाई नळदुर्ग पोलिसांनी केली. ट्रक क्रमांक एम. एच.12,KP 0049 असून,ट्रकमधील माल व बिलाबाबत ट्रक चालकास विचारणा केली सता,उडवाउडवीची उत्तरे प्राप्त झाल्याने सदर ट्रक पोलिसांतर्फे जप्त करण्यात आला आहे. ट्रकमध्ये जवळपास २५ टन माल असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजले असून नळदुर्ग पोलिसांनी सदर ट्रक इटकळ पोलीस ठाण्यात लावला आहे व याबाबत तुळजापूर तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार साधत सदर माल रेशनचा आहे की नाही..? हे तहसील कार्यालयाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.पण ‘या ‘ तांदूळाचा भात शिजतोय तरी कुठे ? हा मात्र “न उलगडणारा प्रश्न” सर्वासामान्य जनतेसमोर निर्माण झाला आहे.
तीन दिवस उलटूनही अद्याप तुळजापूर तहसील पुरवठा विभागातर्फे पंचनामा झालेला नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे, नळदुर्ग पोलिसांनी गाडी जप्त करून संबंधित अहवाल तुळजापूर तहसीलदार यांना पाठवले आहे.पोलिसांनी सदर वाहन, रात्री पकडल्यावर वाहन चालकाला मालाच्या बिले (पावत्या)बाबत विचारना केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली पण दुसऱ्या दिवशी बिले(पावत्या)जमा केल्याबाबत माहिती उघडकीस आली आहे.
तांदूळ वाहतूकबाबतची कागदपत्रे,रेशनचा असेल तर शासकीय पत्र, किंवा व्यापाऱ्याचा असेल तर खरेदीचे बिले या ट्रक सोबत नसल्याचे स्पष्ट दिसून आले पण दुसऱ्या दिवशी जमा केलेली कागदपत्रे ही जाणीवपूर्वक बनावट तयार करून जमा केलेली असू शकतात अशी चर्चा नागरिकांतुन रंगताना दिसून येत आहे.नेमकं हे धान्य कुठून आले व कुठे जात होते?ही माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.
लॉकडाऊन काळात जिल्ह्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात भात शेतीतर कुणी शेतकरी करीत नाहीत. मग नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ येतो तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर ट्रकच्या-ट्रक भरून सदर माल जातो तरी कुठे व या तांदूळाचा भात शिजतो तरी कुठे ? हेसुद्धा पडताळून पाहणे आवश्यक आहे.याबाबत गुन्हे दाखल करण्याचे अधिकारी पोलिसांना नाहीत. तहसिलदारांचे पत्र किंवा अहवालानंतरच याप्रकरणी कारवाई होणार आहे.त्यामुळे तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.