सचिन बिद्री:
दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय मुला मुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील तुळजाभवानी मतिमंद अपंग अनाथ मुलांच्या बालगृहाने घवघवीत यश संपादन केले आहे, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दोन व तीन डिसेंबर दरम्यान दिव्यांग
मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जि प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, ग्रामीण विकास प्रकल्पाचे पी पी शिंदे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यातील अपंग मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकुरगावाडी येथील ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ कदेर संचलित तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांच्या बालगृहातील 45 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये 50 व 100 मीटर धावणे, गोळा फेक, स्पॉट जंप, 25 मीटर पोहणे,बादलीत बॉल टाकने, इत्यादी स्पर्धेमध्ये 13 सुवर्ण 10 रजत 09 कास्य पदक पटकावले आहे तसेच चित्रकला व हस्तकला यामध्येही प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सांस्कृतिक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उस्मानाबाद येथील नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मतिमंद प्रवर्गातून सामूहिक कला प्रकारावर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची पारितोषिक या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
सर्व विजयी स्पर्धकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष गोविंद शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक बालाजी शिंदे,अधीक्षक गजानन शेवाळे व सर्व कर्मचाऱ्यांनी केले असून बालगृहातील विद्यार्थी अनाथ असून ते दिव्यांग असल्याने त्यांचे विशेषत: सर्व स्तरातून कौतुक होत आहे.