सोलापूर : माढा येथील शिवलाल रामचंद वाचनालय माढा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन वाचनालयाचे सहकार्यवाह मदन मुंगळे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात आला.
“डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.त्यांना प्रत्येक क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक.राजकीय.आर्थिक.शैक्षणिक.धार्मिक.पत्रकारिता.कायदे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून अमोघ वक्तृत्व व कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांनी दीन दलितांच्या.श्रमिकांच्या.शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्कासाठी जागं केलं.बाबासाहेब म्हणजे प्रेरक.उध्दारक व तारक शक्ती होय. आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार विचार यांची सांगड घातली.”असे मनोगत मदन मुंगळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सचिन भालेराव.इक्बाल मोमीन.गणेश नाईकवाडे.विष्णु कांबळे.भिकुलाल राऊत.चंद्रकांत चव्हाण.भागवत वनकळसे.सुनिल वाळके छाया आखाडे.विजया बळे आदी सह वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वाचनालयाचे ग्रंथपाल कांतीलाल साळुंके यांनी केले.
संदीप भगत