₹१,६३,६८०/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त

सचिन बिद्री:उस्मानाबाद

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी संचालक(दक्षता व अंमलबजावणी) सुनिल चव्हाण,औरंगाबाद विभागाचे विभागीय उपआयुक्त पी. एच. पवार यांचे आदेशानुसार व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, उमरगा कार्यालयाने दिनांक 9 डिसेंबर रोजी लोहारा तालुक्यातील होळी तांडा येथील आरोपीच्या राहत्या घरी,गोवा निर्मीत व गोवा राज्यात विक्रीस असलेले दारुचे २२ बॉक्स (१०५६ बाटल्या) सह एकुण
१,६३,६८०/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत उत्तम माणिक राठोड, वय 52 वर्षे, रा. होळी तांडा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद यांस अटक करुन त्याचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ०२ दिवसांची पोलिस कोठडी मिळालेली आहे. सदरच्या कारवाईत एस. जी. भवड निरीक्षक तुळजापुर, तानाजी कदम निरीक्षक भप उस्मानाबाद- लातुर, प्रदीप गोणारकर प्र-निरीक्षक तलमोड, रघुनाथ कडवे निरीक्षक भप बीड सर्वश्री दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे, प्रभाकर कदम,सुमीत चव्हाण व कर्मचारी राजेंद्रसिंह ठाकुर, विनोद हजारे, झुंबर काळे, अभिजीत भोंगाणे, अविनाश गवंडी, तुषार नेर्लेकर, कोंडींबा देशमुखे,
सुरेश वाघमोडे, बालाजी भंडारी, महेश कंकाळ व राजेश गिरी यांचा समावेश आहे व पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. एस. बी. सिद उमरगा हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *