उस्मानाबाद : उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त उमरगा येथे फळ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम दि .१२ रोजी घेण्यात आला.
शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तर उमरगा शहरातील कुंभारपट्टी येथील नगरपालिकेच्या अंगणवाडी क्रमांक सात मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर बलसुर येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (व्हर्चुअल रॅली ) ऑनलाइन आभासी सभेचे आयोजन करण्यात आले होते . यात कार्यकर्त्यांना व नागरिकांना राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मान्यवरांचे विचार ऐकता व पाहता आले .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष प्रताप तपसाळे ,विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष खाजा मुजावर,सरचिटणीस धीरज बेळंबकर, जगदीश सुरवसे, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, युवक तालुका कार्याध्यक्ष शंतनू भैया सगर, विद्यार्थी प्रदेश सचिव अजित पाटील, अल्पसंख्यांक ता .अध्यक्ष हाजी सय्यद,सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गुरप्पा शेटगार, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, अल्पसंख्यांक ता उपाध्यक्ष अल्ताफ पटेल, युवक सचिव सुरज भोसले, मुन्ना सुरवसे, युवक शहर उपाध्यक्ष साजीद लदाफ, विष्णू माने, ज्येष्ठराज चव्हाण, काशिनाथ गायकवाड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सविता पवार, संगीता सलगर ,अंगणवाडीच्या शिक्षीका तेजश्री पाटील , राजश्री माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सचिन बिद्री