मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रोहा रेल्वे स्थानकात अपुऱ्या असलेल्या सोयीमुळे प्रवाशी यांना सतत त्रास सहन करावा लागत होता , रोहा मधून सकाळी ०५.१५ मी सुटणारी रोहा- दिवा मेमु गेल्यावर पनवेल , बेलापूर , वाशी , मुंबई येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या कामगारवर्ग , व्यापारी , तथा विध्यार्थीवर्ग सकाळच्या वेळेत रेल्वे सेवा उपल्बध नव्हती त्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यासाठी रोहा मधून सकाळी ०६ ते ०७ वाजताच्या दरम्यान सुटणारी नवीन रोहा – दिवा मेमु सेवा उपल्बध व्हावी यासाठी रोहा रेल्वे प्रवाशी महासंघाने माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना विनंती केली होती तसेच रोहा मधून नवीन मेमु सुरू झाल्यास रोहा , निडी , नागोठणे , कासु या विभागातील प्रवाशी यांना मोठा उपयोग होईल असे सांगितले होते त्या अनुषंगाने माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री अनिल कुमार लाहोटी यांची आमच्या समिती समवेत भेट घेतली होती , तसेच नवीन मेमु मंजूर करण्यासाठी रेल्वे बोर्ड दिल्ली येथे पाठपुरावा केला होता व रेल्वे बोर्डाने रोहा मधून सकाळी ठीक ०६.४० मी सुटणारी रोहा – दिवा मेमु ट्रेन मंजूर करून घेतली , त्यासाठी रोहा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या शिस्टमंडळाने माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब आणि माननीय आमदार श्री अनिकेतभाई तटकरे यांची भेट घेऊन आभार मानले तसेच खासदार साहेब लवकरात लवकर रोहा , निडी , नागोठणे आणि कासु मधील सर्व रेल्वे समस्या सोडवल्या जातील असे सांगितले .दिवा-सावंतवाडी या गाडीला , रोहा , नागोठणे , कासु , पेण येथे थांबा देणे ,रोहा मध्ये पूर्वी थांबत असलेल्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुर्ववत करणे ,रोहा ते पनवेल प्रवास करताना तिकीट दर हे पसेंजर गाडीचे मिळावेत आणि इतर समस्या लवकरात लवकर सुटतील अशी आशा समितीला आहे