मागील काही दिवसांपासून आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असून नुकतेच पोलादपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे.
आमदार भरत गोगावले यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोंडा, वझरवाडी,लोहारे, हळदुळे, कापडे बुद्रुक आदिवासी वाडी तसेच पोलादपूर शहरातील वरचा मोहल्ला येथील काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
तसेच यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हा संघटिका निलीमा घोसाळकर, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.