येथील सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक संस्था गरुडझेप २०२२ म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांची विभागीय मिटिंग २०२२ नागपूर, येथील साई सभागृह, येथे झाली. एमएस-सीआयटी, टॅली व इतर क्लिक या सर्व कॉम्पुटर कोर्सेस चे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश नोंदविल्याबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ मॅडम यांच्या हस्ते नितीन येरोजवार यांना हा पुरस्कार देण्यात आला.
गेल्या 31 वर्षापासून मुल तालुक्यातील सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटर हि संस्था विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे कार्य यशस्वीरित्या करीत आहे. यापूर्वीही अनेक पुरस्कार या संस्थेला मिळालेले आहेत. पाच संगणकापासून ५० कॉम्पुटरची लॅब सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटर या संस्थेने उभारली आहे. या यशामागे संचालक नितीन येरोजवार व इतर सर्व सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटरचे शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएल विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोळी सर, विकास देसाई सर, अमित रानडे सर आरएलसीचे व्यवस्थापक देशपांडे सर, तसेच चंद्रपूर एलएलसीचे को-आर्डीनेटचे लक्ष्मीकांत कांबळे सर, व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.
मुल (सतीश आकुलवार)