विद्यार्थ्यांचे शाळेत शाळेत येण्याचे प्रमाण घटले व शाळा मध्यंतरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढले.
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी म्हणजेच विद्येची नगरी इथे बऱ्याच लांबून मुलं शाळेत शिकण्यासाठी येत असतात. काही मुले ब्रह्मपुरीच्या आसपास खेड्यांमध्ये राहणारे असल्याने ते सायकलने प्रवास करून शाळेमध्ये येत असतात. तुलांमाल,सायघाटा, हत्ती लेंडा, खेड, तोरगाव ,मोवशी, मेंढा. अशा अनेक ब्रह्मपुरी च्या अवतीभवती असणाऱ्या खेड्यापाड्यांमधून विद्यार्थी सायकलने शाळेमध्ये येत असतात ब्रह्मपुरी च्या आसपास तीन किलोमीटर नंतर घनदाट जंगलाने वेडा घातलेला आहे या संपूर्ण घनदाट जंगलामध्ये अनेक वाघांची टोळी ठिय्या मांडून बसलेली आहे तसेच इतरत्र फिरताना सर्व जनतेला दिसून राहिलेले आहेत. वाघ म्हणजेच हिंस्र प्राणी या हिंस्र प्राण्याने आजवर ब्रह्मपुरी च्या आसपास जंगलामध्ये किंवा जंगलाच्या आसपास काम करणाऱ्या लोकांना फस्त केलेल्या आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये सायगाटा जंगल विभागात एक वाघीण आपल्या चार पिलांची चमू घेऊन इतरत्र बिनधास्त फिरताना दिसत आहे तसेच एका व्यक्तीला खाल्ले सुद्धा आहे त्यामुळे घाबरून विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ब्रह्मपुरी नगरी उद्या चालून वाघांची नगरी म्हणून सुद्धा ओळखल्या जाऊ शकते कारण ब्रह्मपुरी च्या आसपास असंख्य वाघांची संख्या दिसून येत आहे. आज पर्यंत अनेक वाघांना जेरबंद सुद्धा करण्यात आले पण एकारा जंगलातील वाघ सायगाटा जंगलाचा आसरा घेऊन इतरत्र भटकंती करून राहिलेले आहेत त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.