“आरंभ प्रतिष्ठान” च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी/दादर/महिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ, मानाची शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब, स्थानिक आमदार श्री. सदा सरवणकर, माझी नगरसेवक श्री. नाना आंबोले, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष श्री. नरेंद्र गावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्तेचा सहभाग वाखण्याजोग होता. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख आयोजक संस्थेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत धावले, श्री. इंद्रजित तिवारी, श्री. विकास माने, श्री. जितेंद्र कांबळे, श्री. चारुहास हंबीरे, श्री. जयवंत पवार, श्री. विकेश जैन, श्री. ओमकार गुरव, श्री. जितेंद्र गुप्ता, श्री. दादा शिरसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.