मुंबई : एका जैन मंदिरात चोरीची घटना घडली. यावेळी चोराने एक नवी पद्धत अवलंबला, या चोराने जैन उपासकाच्या वेशात जैन मंदिरातून सोनं चोरी केलं आहे. याप्रकरणी एका ५३ वर्षीय व्यक्तीला दिंडोशी परिसरातून अटक करण्यात आली. या आरोपींकडून पोलिसांनी सोन्याची प्लेट, १६० ग्रॅम वजनाचा सोन्याचा रॉड आणि एक स्कुटी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वस्तुंची एकूण किंमत सुमारे पाच लाख तीस हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मंदिरातील चोरीच्या वस्तू विकून मिळालेल्या पैशांतून हे आरोपी जुगार खेळायचे. आरोपी जैन मंदिरातून सोन्या-चांदीच्या पाट्या चोरत असत. क्राईम पेट्रोल या कार्यक्रमापासून प्रेरित होऊन या चोरी करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपी हा जैन समाजाचा सदस्य म्हणून तसा पेहराव करतो आणि मुखवटा घालायचा, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.