मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेची सुरू असलेली सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोग आता निर्णय घेण्याची शक्यता आहे.
16 आमदारांची अपात्रता आणि अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाबाबत निर्णय देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.