मुंबई : आदित्य ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अर्थात वरळी मतदारसंघात उभे राहून दाखवावे असे आव्हान दिले होते. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता वरळीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर हा सत्कार सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर नागरी सत्कार यावेळी होईल. वरळी भोईवाडा समिती आणि सर्वोदय नाखवा समिती यांच्या माध्यमातून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.