कुंडलवाडी प्रतिनिधी
कुंडलवाडी नगर परिषदेत प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.तदनंतर शहरातील विविध विद्यालयातील दहावी,बारावी परिक्षेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा व प्रभात फेरेतील समावेश असलेल्या विविध शाळेतील मुख्याध्यापकांचा नगर परिषदतर्फे मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र देवून यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनोद माहूरे,सपोनी.विश्वजित कासले,मा.नगराध्यक्ष सुनिल बेजगमवार,उपनगराध्यक्ष,शैलेश -याकावार,सोसायटीचे व्हा.चेअरमन संतोष पाटील शिवशेट्टे,माजी.नगरसेवक नगरपरिषद कर्मचारी शहरातील सर्व शाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक शहरातील नागरीक प्रतिष्ठित नागरीक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
