section and everything up until
* * @package Newsup */?> यवतमाळ : विश्व वारकरी संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी ह.भ.प.देवानंद पुजारी यांची निवड | Ntv News Marathi

यवतमाळ : उमरखेड येथील धार्मिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले ह.भ.प. देवानंद विश्वनाथ पुजारी यांची विश्व वारकरी संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हरी नामाचा पताका खांदयावर घेवून अनेक वर्षापासून त्यांनी केलेल्या प्रवचन,भजन, हार्मोनियम वादन इत्यादी सेवेच्या माध्यमातून त्यांचे समाज घडविण्याचे कार्य सुरू असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची निवड विश्व वारकरी संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प पुरूषोत्तम महाराज झाडगांवकर यांनी केली आहे.

विश्व वारकरी संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी ह.भ.प.देवानंद पुजारी यांची निवड

सध्याच्या विज्ञान युगात भक्ती मार्गाच्या प्रसार व प्रचारा अभावी उदयाच्या देशाची आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या भावी पिढीला मुळ भारतीय संस्कृतीचा व पावन भुमी मध्ये जन्माला आलेल्या साधू व संत महात्म्यांच्या आदर्श संस्काराचा पार विसर पडल्याने अनेक युवा पिढी व्यसनाच्या आहारी जावून आपले जिवन उध्वस्त करीत आहेत. व्यसनापासून मुक्त करण्यासाठी गावागावात भागवत सप्ताहाच्या माध्यमातून हीन्दू धर्मातील पवित्र असा श्रीमद् भागवत कथा, कीर्तनातून संताच्या कार्याची ओळख होणे गरजेचे आहे. या साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात विश्व वारकरी संघ स्थापन करून भक्तीमय वातावरण तयार करणे गरजेचे असल्याचे मानस विश्व वारकरी संघाचे महाराष्ट अध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज झाडगांवकर यांनी व्यक्त केले आहे. या अनूशंगाने विश्व वारकरी संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी त्यांनी ह.भ.प. देवानंद पुजारी यांची निवड केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात विश्व वारकरी संघ स्थापन करून आध्यात्माचा प्रचार व प्रसार करण्याचे मानस विश्व वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. देवानंद पुजारी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *