यवतमाळ : यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा पुणे व पंचायतराज प्रशिक्षण केन्द्र पुसद यांच्या संयूक्त विद्यमाने उमरखेड तालुक्यातील सरपंचांच्या तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा दि . २६ ऑगस्ट रोजी थाटामाटात समारोप झाला . या प्रशिक्षण शिबीरात सरपंचांचे अधिकार, ग्रा.पं. अधिनियम, जल व्यवस्थापन कार्य जल जमीन , ग्रा.पं. अभिलेखे 1 ते 33 अशा प्रकारचे सर्वांगिण प्रशिक्षण देण्यात आले
या प्रशिक्षणामुळे सरपंच मंडळीना त्यांच्या हक्क व अधिकाराची जाणिव होऊन विकास कामांना गती देण्याचे काम सक्षमपणे करतील असा दृढ विश्वास सभापती खडसे यांनी व्यक्त केला आहे . तालुक्यातील सरपंच या प्राशिक्षणाला मोठ्या संख्येने सहभागी होते . या समारोप कार्यक्रमात उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे यांनी मार्गदर्शन केले यावेळी तालुक्यातील सरपंचांच्या वतीने सभापती खडसे यांचा शाल श्रीफळ . देऊन यथोचित सन्मान करण्यात आला . सभापती खडसे यांच्या हस्ते सरपंचांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले .