उमरखेड़:- २००१ ते २००६ या कालावधीमध्ये बाबा जागीरदार हे उमरखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी न्यायप्रिय, शिस्तप्रिय प्रशासन चालवुन स्वच्छता, विकास कामे व नवीन बगिच्यांची निर्माण करण्यावर जोर दिला होता. त्याच बरोबर नगरपालिका अंतर्गत होत असलेल्या विकासकामाच्या गुणवत्तेवर स्वतः जातीने लक्ष द्यायचे. विभाग व राज्य पातळीवर त्यांनी स्वच्छता अभियानामध्ये उमरखेड नगरपालिकेला पुरस्कार मिळवून दिला होता.
पद ,प्रतिष्ठा, मानसन्मान व श्रीमंती या मार्गाने बाबा जागीदार गेले नाहीत त्यांचे नाव व आडनाव दिलेदारपणा – साजेशे जीवन त्यांनी व्यतीत केले . राजकारणातील एक अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले
अतिशय प्रामाणिक सर्वधर्म समभाव बाळगणरे बाबा जागीरदार यांच्या निधनाने उमरखेड शहर व परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,सुन व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.