यवतमाळ : बहुचर्चित राज्यसेवा परीक्षेचा गोंधळ, अनागोंदिचा बळी आणि आता परिक्षेच्या पूर्वसंध्येला ‘परीक्षा रद्द’चा निर्णय ! काय चाललय ? या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केला. सरकारने रयतेची परीक्षा घेवू नये. जनतेचा अंत पाहू नये अन्यथा परिणाम वाईट होतील असा ईशारा देतानाच सरकारने परीक्षार्थ्यांना तत्काळ 3000 रूपयांची नुकसान भरपाई देत पुढच्या वेळी परिक्षेसाठी एसटी चा मोफत पास द्यावा ! अशी मागणी केली आहे.
आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र परजिल्ह्यात आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. अनेक मुली आपल्या नातेवाईकांच्या सोबत प्रवास करीत आहेत. अनेकांनी लॉजिंग केले असून ऐन वेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालक देखील संतापले आहेत.
परीक्षा राज्यात होत असताना परीक्षा केंद्र ईतर राज्यातच नव्हे तर उत्तर प्रदेशात दर्शविन्याचा प्रकार शिवाय हॉल तिकीट डाउनलोड न होने ह्या साऱ्या तक्रारी झाल्यानंतरही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा वेळेतच होणार असल्याची दिलेली जाहीर कबुली हा सर्व प्रकार पाहता सरकार किती गंभीर आहे हे जनतेला कळले आहे असे नितीन भुतडा म्हणाले. एकंदर काळ्या यादीमध्ये असलेल्या कंपनिला कुणाच्या स्वार्थासाठी कंत्राट दिले असा सवालही त्यांनी यावेळी केला.
खरतर राज्यसेवा परीक्षेतील गोंधळ आणि अनागोंदिचा बळी गेला तेव्हाच सरकारने गंभीर पाऊल उचलने आवश्यक होते मात्र सरकार निगरगट्ट झाले असून परिक्षेच्या पूर्वसंध्येला ‘परीक्षा रद्द’चा निर्णय घेणाऱ्या या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न करीत सरकारने रयतेची परीक्षा घेवू नये. जनतेचा अंत पाहू नये अन्यथा परिणाम वाईट होतील असा ईशारा दिला. सरकारने परीक्षार्थ्यांना तत्काळ 3000 रूपयांची नुकसानभरपाई देत पुढच्या वेळी परिक्षेसाठी एसटी चा मोफत पास द्यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली आहे.
Skip to content