जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसोबत राहते. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने अल्पवयीन मुलीला पाण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी बोलावले. यानंतर घराचा दरवाजा बंद केला, वाईट उद्देशाने मुलीचे अंगावरील कपडे काढून तिचे अंगावर चादर टाकून तिच्यासोबत अंगलटपणा करत तिचा विनयभंग केला.
घरी परतल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या आई वडीलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विनयभंग करणाऱ्या रोहित युवराज भावसार या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत.