फैजपुर ,जलगांव
येथून जवळच असलेल्या पिंपरूड तालुका यावल येथे राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळातर्फे युवा दिन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार व द्विपप्रज्वलन करून तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सन्मान तथा दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट व साहित्य वाटप करण्यात आले. फैजपूर शहरातील पत्रकारांना सन्मानपत्र व शाल, गुलाबपुष्प, पेन, वही देऊन सन्मानित करण्यात आले. येथील राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ हे दरवर्षीप्रमाणे पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना तसेच पत्रकारांचा सन्मान करित असतात.सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत एक निस्वार्थ काम करणारे राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ हे स्वतः दिव्यांग मित्र परिवार असून सुद्धा समाजातील प्रत्येक कार्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलक, फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, प्रसिद्ध लेखक धनंजय कोल्हे जळगाव, पीएसआय मोहन लोखंडे यांच्या हस्ते सन्मान पत्र व साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी कैलास कडलक होते.
त्यांनी पत्रकार व दिव्यांग बांधवाना मोलाचे मार्गदर्शन व राहुल कोल्हे मित्र परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. जेष्ठ तसेच पत्रकार प्रा. उमाकांत पाटील यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून सांगितले कि, राहुल कोल्हे मित्रपरिवार दरवर्षी न चुकता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व युवा दिन व पत्रकार यांचा मोठया थाटात सन्मान करतात ही खूप कौतुकास्पद बाब आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना चौधरी, विशाल दांडगे, पराग वारके,चिराग पाटील, चेतन तळेले, भगवान कोळी हे सात मित्र एकजुटीने कार्य करीत असतात असे त्यांनी सांगितले. या पत्रकारांचा झाला सन्मान- वासुदेव सरोदे, अरुण होले,प्रा. उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, निलेश पाटील, शेखर पटेल, समीर तडवी, संजय सराफ, अरुण होले, प्रा. राजेंद्र तायडे, फारुख शेख, शाकीर मलिक, इदू पिंजारी, मयूर मेढे, राजू तडवी, विनोद कोळी, सलीम पिंजारी, विशाल दांडगे, संघरत्न सपकाळे तसेच दिव्यांग बांधव अशोक कोळी, विनोद बिराडे या दोघं कुटुंबांना ब्लॅंकेट व विलास कोळी यांना कुबड्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन महाजन तर आभार चेतन तळेले यांनी केले. यावेळी दिव्यांग बांधव ग्रामस्य उपस्थित होते.