जळगाव : जिल्हयातील रावेर तालुक्यातील चिनावल व वडगाव शिवारातील केळी बागेत काही विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केळीचे खोड कापून शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले. आज सदर ठिकाणी भेट दिली.
यावेळी चिनावल येथील नुकसान ग्रस्त शेतकरी श्री. पंकज भागवत नारखेडे व वडगांव येथील श्री.दगडू उखर्डू पाटील व डॉ.मनोहर नारायण पाटील यांच्या केळी बागांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून सदर घटनेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा योग्यती कार्यवाही करणे बाबत श्रीमती रक्षाताई यांनी निर्देश दिले. यावेळी माझ्यासह, माजी सभापती श्री.गोपाळ नेमाडे, माजी सरपंच श्री.योगेश बोरोले, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री.सागर भारंबे, भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री.नथ्थू धांडे, श्री.राहुल पाटील, श्री.राहुल महाजन, श्री.संजय माळी, श्री.उमेश राणे, हेमंत ठाकूर, श्री.मुरलीधर माळी, श्री.बाळू काकडे, श्री.कांतीलाल माळी, श्री.समाधान वानखेडे, श्री.दिलीप भारंबे इ. उपस्थित हो