लातूर
ज्या महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना आपलंसं करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राज्य कोणा एका जातीचा पंथाचा नसतो हे त्या काळात सिद्ध केलं. अठरा पगड जातींना सोबत घेऊन एक दिशा या देशाला दिली त्याचा विसर काहींना पडू शकतो पण आम्हाला नाही. महाराजांचे नाव घेऊन जातीपातीच्या राजकारणाच्या मानगुटीवर अधिराज्य गाजवणारे महाराज त्त्यांना कळणार नाहीत. बहुतांश सरदार शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम होते, सर्व धर्माचा सन्मान करणारे राजे होते पण काही राज्यकर्त्यान्ना याचा विसर पडला आहे. कुळवाडी भूषण एकनिष्ठ प्रधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना लातूर स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मोहसीन खान, शादूल शेख, देवा गायकवाड़, जब्बार बागवान, हाफिज पठाण उपस्थित होते.
मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529