दारूबंदी कायद्याअंतर्गत 12 व्यक्ती विरोधात 10 गुन्हे दाखल.
02 लाख 84 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर दि 20/02/2023
लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपविभाग चाकूर व अहमदपूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर व अहमदपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्फत चाकूर व अहमदपूर उपविभागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान दिनांक 19/02/2023 रोजी मद्य विक्रीवर निर्बंध असतानाही काही इसम देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने चाकूर व अहमदपूर तालुक्यात ठीक ठिकाणी छापेमारी करून देशीदारूची अवैध व विनापास, परवाना चोरटी विक्री व्यवसाय करीत असताना, देशी दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या दोन्ही तालुक्यातील एकूण 12 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून देशी विदेशी दारूचा 02 लाख 84 हजार 110 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर छापे मारीत अहमदपूर व चाकूर येथील प्रत्येकी एक एक बार वर कारवाई करण्यात आली आहे तसेच अहमदपूर येथील छापा कारवाईत देशी-विदेशी मद्यासह लोखंडी हत्यार कोयता मिळून आल्याने तो ही जप्त करून भारतीय हत्यार कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे अहमदपूर, किनगाव, वाढवणा, चाकूर, रेनापुर, शिरूर आनंतपाळ या ठिकाणी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.
अहमदपूर व चाकूर तालुक्यात दिवसभर चाललेल्या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर व अहमदपूर चे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वातील चाकूर व अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी सदरची कामगिरी केली आहे.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529