लातूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेमध्ये “तळवे चाटू” हा शब्दप्रयोग केला. देशाच्या गृहमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित कशी राहील या पद्धतीसाठी प्रयत्न करून गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून देशाला एकसंघपणे ठेवण्याचं काम करायला पाहिजे होतं आणि त्याच पद्धतीची शपथ त्यांनी मंत्रीपद घेतल्यानंतर घेतली होती. मी आकस बुद्धीने काम करणार नाही, सूड भावनेने काम करणार नाही, देशाची अखंडता राखेल, अशी शपथ घेऊन खुर्चीवर बसलेले देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या तमाम तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे शिवसेना परिवाराचे कुटुंबप्रमुख आमचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द काढून तमाम महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयन लोकांच्या मनाला ठेच पोहोचवणार वक्तव्य अमित शहा यांनी केला असे लातूर जिल्हा शिवसेना पक्षप्रमुख शिवाजी माने यांनी निवेदनात म्हंटलंय. पुढे बोलताना माने म्हणाले कि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या करंगळीला धरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अथक अशा प्रयत्नाने या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे भारतीय जनता पार्टी उदयास आली एवढेच काय देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनाच भारतीय जनता पार्टीतील काही जेष्ठ नेत्यांनी राजकारणातून हद्दपार करण्याचे ठरवलं होतं. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन केंद्रीय नेतृत्वाला सांगून नरेंद्र मोदी यांना राजकारणात टिकवलं तेच आज देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्याच मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा काम करतात त्या अमित शहाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल काढलेले अपशब्द महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतोय. याच अनुषंगाने दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर शिवाजी माने यांनी लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार देऊन अमित शहा यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी असा तक्रारी अर्ज दिलेला आहे. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांनी कायदेशीर कार्यवाही करू असे सांगितले. यावेळी शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *